
आंबेडकर जयंती भाषण मराठी | Ambedkar Jayanti speech in Marathi | भीम जयंती | Bhim Jayanti
आंबेडकर जयंती भाषण मराठी | Ambedkar Jayanti speech in Marathi | भीम जयंती | Bhim Jayanti #आंबेडकर_जयंती_भाषण #ambedkarjayantispeech #ambedkarjayantibhashan #भीम_जयंती_भाषण #बाबासाहेब_आंबेडकर_जयंती_भाषण #BabasahebAmbedkarjayantibhashan #BabasahebAmbedkarjayantispeech #बाबासाहेब_आंबेडकर_इतिहास #बाबासाहेब_आंबेडकर_विचार #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांचे_कार्य #बाबासाहेब_आंबेडकर #भीमराव_आम्बेडकर #बॅरिस्टर_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #DrBabasahebAmbedkar #BhimraoAmbedkar #BhimraoRamjiAmbedkar https://www.facebook.com/sumedhkumar.... मित्रांनो, आज १४ एप्रिल, हा दिवस आपल्यासाठी फक्त एक तारीख नाही, तर एक प्रेरणा दिवस आहे. कारण मित्रांनो, आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, आणि करोडो शोषित-उपेक्षितांच्या हृदयातील परमेश्वराचे स्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त मी सर्वप्रथम बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो. आणि आपल्या सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.मित्रांनो, डॉ. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणापासूनच त्यांना जातीभेदाचा, अस्पृश्यतेचा कठोर अनुभव आला. शाळेत त्यांना वेगळं बसवलं जायचं, पाण्यासाठी त्यांना तहानलेलं राहावं लागे, आणि समाजाकडून अपमान सहन करावा लागायचा. पण या सर्व गोष्टींनी बाबासाहेब खचून गेले नाही तर, उलट त्यांच्या मनात एक अग्नी पेटला – आणि तो अग्नी होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि समाजाला बदलण्याचा. आणि या अन्यायाविरुद्धच्या लढाईत बाबासाहेबांनी शिक्षणालाच आपले शस्त्र बनविले. “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो कुणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” या विचाराने त्यांनी स्वतः प्रचंड कष्ट घेऊन शिक्षण घेतलं. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी, नंतर कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट, आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण करून ते पहिले भारतीय बनले ज्यांनी इतक्या उच्च स्तरावर शिक्षण मिळवलं. हे सगळं करताना ते कधीही आपला मूळ उद्देश विसरले नाहीत आणि तो उद्देश म्हणजे समाजातील शोषित वर्गाला न्याय मिळवून देणे. आणि आपल्या उद्देशाचाच एक भाग म्हणून १९२७ मध्ये बाबासाहेबांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाला आवाज मिळवून दिला. हा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हता, तर मानवी हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी होता. त्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी घेण्यास मनाई होती. बाबासाहेबांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि हजारो लोकांना सोबत घेऊन चवदार तळ्यावर आपल्या ओंजळीने महाडच्या तळ्याचे पाणी प्राशन केले. बाबासाहेबांचा हा लढा अत्यंत धाडसी होता, कारण त्यांना ब्राह्मणी वर्चस्वाचा प्रचंड विरोध सहन करावा लागला. पण बाबासाहेबांनी हार मानली नाही. त्यांनी समाजाला हे दाखवून दिलं की, पाणी हे सर्वांचा हक्क आहे आणि कोणीही माणूस दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सर्व माणसे समान आहेत. या सत्याग्रहाने अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्याला नवीन चेतना दिली. या लढ्याच्या दरम्यान २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथेच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती हे एक असं पुस्तक होतं ज्याने जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या रूढींना पाठबळ दिलं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की, जो ग्रंथ माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही, जो ग्रंथ असमानतेची शिकवण देतो, त्याला समाजात स्थान असू शकत नाही. त्यांनी मनुस्मृती जाळून एक ऐतिहासिक सामाजिक बंडाचा नारा दिला. हा प्रसंग म्हणजे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचं प्रतीक ठरला. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि शोषित समाजामध्ये नवीन जागृती निर्माण झाली. १९३० मध्ये नाशिक येथे बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जायचा, कारण त्यांना “अशुद्ध” मानलं जायचं. बाबासाहेबांनी हा भेदभाव संपवण्यासाठी हा लढा उभारला. हजारो लोकांसह त्यांनी मंदिराच्या दारापर्यंत मोर्चा काढला. हा सत्याग्रह म्हणजे धार्मिक समानतेची मागणी होता. हा लढा यशस्वी झाला नाही, पण त्याने समाजाला जागृत केलं आणि अस्पृश्यतेच्या मुद्द्यावर देशभर चर्चा सुरू झाली. बाबासाहेबांचे विचार हे काळाच्या कितीतरी पुढचे होते. जो आजही आपल्याला स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतो. त्यांचं म्हणणं होतं की, शिक्षणाशिवाय माणूस अंधारात राहतो, आणि संघटनेशिवाय त्याला शक्ती मिळत नाही. त्यांनी समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं, कारण त्यांना माहिती होतं की, जोपर्यंत शोषित समाज एकजूट होत नाही, तोपर्यंत त्याच्यावरचा अन्याय संपणार नाही. म्हणून त्यांनी आपल्याला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मंत्र दिला. बाबासाहेबांचा समतेवर ठाम विश्वास होता. १९४७ मध्ये बाबासाहेबांची संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी सुमारे दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम करून भारतीय संविधान लिहिले. ही राज्यघटना म्हणजे फक्त कायदा नव्हे तर कायद्यांचा कायदा आहे, एक दृष्टिकोन आहे. त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे अंतर्भूत आहेत. बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि मूलभूत अधिकार दिले. त्यांनी जातीभेद, लिंगभेद आणि धर्मभेद दूर करून एक समताधिष्ठित समाजाची कल्पना मांडली.