नारळी पौर्णिमा... मराठी कविता✒️✒️ (कवयित्री - अबोल बनसोड,गोंदिया )

नारळी पौर्णिमा... मराठी कविता✒️✒️ (कवयित्री - अबोल बनसोड,गोंदिया )

माझी लेखणी साहित्य मंचआयोजित ‌ रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्ताने व्हिडिओद्वारे स्वरचित काव्य सादरीकरण उपक्रम.दि.१३/८/२०२४. मंगळवार . विषय-रक्षाबंधन. शीर्षक-नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा सण भाऊ-बहीण सौहार्द नात्याचा संस्कृती जपत करू साजरा रक्षाबंधन सण महत्त्वाचा.१. औक्षण करू भावाला अक्षता,आरती ओवाळून बांधू राखी तयाच्या हाताला दीर्घ आयुष्य देवाला मागून.२. तुझ्याअंगणी समृद्धी पखरण सुखी आनंदी स्नेही जीवन तुझ्या कीर्तीचा डंका वाजो बहिणीच्या या आशीर्वादान.३. भांडण, रुसवा, फुगवा, झाले खेळ बालपणी पाठशिवनीचे नाव आकलन आपले,‌ झेलित पाठीवर भार कमालीचे. माणिक मोती भेटवस्तू ही नको मला आंतरिक प्रेम कायम ठेव नको हट्ट माझे तू पुरवू क्षण आनंदी आठवणीचे लेव गोतावळा माहेर संपन्न मनात वाटे पाहून हर्ष सुखाची सावली मिळे अंतरी येती हर्षित‌ वर्षामागून वर्ष. येईल मी माहेरा कधी वर्तन तुझे सन्मानाचे ठेव प्रत्येक रक्षाबंधन सणाला पूज आठवणीने दर्या देव. चुकीला माझ्या माफी असावी विनंती तुझं आहे,तू देवा सम प्रिय, लाडकी कन्या ह्या घरची एवढा सन्मान ठेव कायम. कुटुंबाचा आधार आहेस आई बाबा आहेत सहारा मिळावे तुज सुख, यश, समृद्धी, तुझ्या यशाचा हो सर्वत्र पसारा. स्वरचित ✍🏻सौ.अबोल बनसोड गोंदिया. *रोल.नं.*‌ML294.