पारंपारिक उकडीचे मोदक | steamed modak | Bappa's favourite #shorts #traditional #ganapatibappamorya

पारंपारिक उकडीचे मोदक | steamed modak | Bappa's favourite #shorts #traditional #ganapatibappamorya

संपूर्ण कुटुंबाला एकत्र जोडणारा हा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.त्याचप्रमाणे नैवैद्यात मोदक अतिप्रीय असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. आम्ही घरातील सर्व महिलांनी मिळून बनवलेली ही उकडीच्या मोदकांची छोटीशी व्हिडिओ. साहित्य: किसलेला ओला नारळ २ वाटी किसलेला गूळ एक वाटी तूप वेलची पावडर सुकामेवा आवडीनुसार तांदळाचे पीठ पाणी