वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये? || शुभ अशुभ झाडे || Plants in Home

वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये? || शुभ अशुभ झाडे || Plants in Home

वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये? || शुभ अशुभ झाडे || Plants in Home according to Vastu Shastra 1) पपई दारात नसावी. संतती व संपत्तीचे नुकसान होते. 2) अंगणामध्ये तुळशी नक्की असावी. परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी. त्याने द्वारवेध निर्माण होतो. 3) घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत. गृहकलह, अशांती, शत्रुभय निर्माण होते. परंतु गुलाब आणि कोरफड चालते. 4) कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी. 5) गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. 6) ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. 7) पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. 8) पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्वप्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो. 9) ज्यांना मूलबाळ होतं नाही, त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. 10) वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. 11) घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत. त्याने अनेक त्रास वाढतात. 12) घराभोवती काटेरी कुंपण असू नये. 13) घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. 14) पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. 15) घराच्या भिंतींवर वेली जाऊ देऊ नयेत. 16) ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात, त्या घराची प्रगती खुंटते. 17) घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. वायु प्रदूषणापासून बचाव होतो. 18) घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच positive energy प्रवेश करते. 19) नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. 20) घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. 21) फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे. 22) कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये. हा दोष मानला आहे. 23) घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात - नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग, नागलता इ. 24) प्लॉटमध्ये रुईचे (अर्क) झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही, तिथे लावू शकता. 25) अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतरच तरुणाचा दहनसंस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. 26) अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशापाण्याची स्थिती चांगली राहते. दु:ख, त्रास होतं नाहीत. 27) घरात बेलफळ आणून ठेवावे. 1-2 आठवड्यांनी ते बदलावे. त्याची पूजाअर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख, समृद्धी नांदते. 28) घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी. 29) आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो. 30) औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या १०० पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात. म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी. हमखास पाणी लागते. 31) घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये. व्हिडिओ आवडला तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा. THANK YOU Only Marathi YouTube Channel ओन्ली मराठी यूट्यूब चॅनल