
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
कोपरगांव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महप्रयान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की,*# ब्लड फॉर बाबासाहेब* या संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयान दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात विविध देशांत तसेच भारतात विविध राज्यात व जिल्हा तालुक्यात भव्य स्वरूपाचे रक्तदान शिबिराचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली जाते. त्याच पद्धतीने कोपरगाव शहरात बुद्धिस्ट यंग फोरम (फोर्स) कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप साहेब यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धूप,दीप प्रज्वलन करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली . यावेळी या दोन्हीही अधिकाऱ्यांनी संघटनेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून सर्व पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले. शहरातील सर्व राजकीय पक्ष,सामाजिक धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या शिबिरास भेट देऊन आपापल्या सहकाऱ्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन दिले . हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष आयु विजुभाऊ त्रिभुवन, उपाध्यक्ष नितिन शिंदे,कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे, खजिनदार संजय दुशींग, ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे साहेब, भिमराज गंगावणे साहेब, सुनिल मोकळ ,सचिन पगारे, संतोष कोळगे, गौतम गायकवाड, भारत सदर, रविंद्र धीवर, किरण कासारे,अजय उशिरे, रवि भालेराव, नानासाहेब रोकडे, कुणाल सातदिवे आदींनी परिश्रम घेतले. या शिबिराचे शेवटी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष आयु विजुभाऊ त्रिभुवन यांनी सर्व रक्त दान दात्यांचे आभार मानले